युद्धाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियात सीबीएसईच्या १०वी-१२वी परीक्षा पुढे ढकलल्या
अबू धाबी , 01 मार्च (हिं.स.)।केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सिबीएससी) ने मध्य पूर्व क्षेत्रातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांसाठी नव्या तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. २ मार्च २०२६ रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियात सीबीएसईच्या १०वी-१२वी परीक्षा पुढे ढकलल्या


अबू धाबी , 01 मार्च (हिं.स.)।केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सिबीएससी) ने मध्य पूर्व क्षेत्रातील इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांसाठी नव्या तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. २ मार्च २०२६ रोजी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (युएई ) येथील सिबीएससी संलग्न शाळांमधील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

बोर्डाने ३ मार्च रोजी बैठक घेऊन ५ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षांबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी आपल्या शाळांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी चिंता करू नये आणि नियमित अभ्यास सुरू ठेवावा. सर्व अधिकृत घोषणा शाळांमार्फतच करण्यात येतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक बनावट नोटीस व्हायरल होत आहे. या कथित परिपत्रकात काही देशांमध्ये असामान्य जागतिक परिस्थिती आणि युद्धसदृश

स्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अलीकडेच सिबीएससी मुख्यालयाकडून सोशल मीडियावर संदेश देत या व्हायरल परिपत्रकाला खोटे ठरवण्यात आले आहे. बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांना अशा अफवांपासून सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसारच घेतल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande