खामेनी यांच्या हत्येप्रकरणी कराचीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने
इस्लामाबाद, 01 मार्च (हिं.स.)।अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येची बातमी पसरताच पाकिस्तानातील कराची येथे अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर आंदोलनाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते वाणिज्य
खामेनी यांच्या हत्येप्रकरणी कराचीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने


इस्लामाबाद, 01 मार्च (हिं.स.)।अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येची बातमी पसरताच पाकिस्तानातील कराची येथे अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर आंदोलनाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते वाणिज्य दूतावासाच्या परिसरात जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर करावा लागला तसेच इशारा म्हणून हवेत गोळीबार करावा लागला.

माहितीनुसार, माई कोलाची रोडवरील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळील आंदोलन हिंसक झाले. जमावाने दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणेने अश्रुधूराचे गोळे डागले आणि लाठीमार केला. या कारवाईत अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अधिकाऱ्यांनी सुलतानाबादला माई कोलाचीशी जोडणारे रस्ते काही काळासाठी बंद केले. तसेच परिस्थिती हाताळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिन्ना ब्रिजवरील वाहतूक आय. आय. चुंद्रीगर रोडकडे वळवण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली असून नागरिकांनी संबंधित परिसरापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande