ऑस्कर २०२६: मायकेल बी. जॉर्डन सर्वोत्कृष्ट अभिनेता, जेसी बकले ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
वॉशिंग्टन, 16 मार्च (हिं.स.)।ऑस्कर 2026 सोहळ्याचे आयोजन लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटर येथे करण्यात आले. 98व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये लिओनार्डो डिकॅप्रिओच्या ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटा
ऑस्कर २०२६: मायकेल बी. जॉर्डन सर्वोत्कृष्ट अभिनेता, जेसी बकले ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री


वॉशिंग्टन, 16 मार्च (हिं.स.)।ऑस्कर 2026 सोहळ्याचे आयोजन लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटर येथे करण्यात आले. 98व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये लिओनार्डो डिकॅप्रिओच्या ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 6 पुरस्कार आपल्या नावावर केले. तर रायन कूगलर दिग्दर्शित ‘सिनर्स’ या चित्रपटाला 4 ऑस्कर पुरस्कार मिळाले. ‘सिनर्स’साठी मायकेल बी. जॉर्डन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर ‘हॅमनेट’साठी जेसी बकले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

98व्या ऑस्कर पुरस्कारांचे विजेते — सर्वोत्कृष्ट चित्रपट – वन बॅटल आफ्टर अनदर, सर्वोत्कृष्ट अभिनेता – मायकेल बी. जॉर्डन (सिनर्स), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जेसी बकले (हॅमनेट), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – पॉल थॉमस अँडरसन (वन बॅटल आफ्टर अनदर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – शॉन पेन (वन बॅटल आफ्टर अनदर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – एमी मॅडिगन (वेपन्स), सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – सेंटिमेंटल व्हॅल्यू, सर्वोत्कृष्ट संपादन (एडिटिंग) – वन बॅटल आफ्टर अनदर, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (ओरिजिनल स्क्रीनप्ले) – सिनर्स (रायन कूगलर), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा (अॅडॉप्टेड स्क्रीनप्ले) – वन बॅटल आफ्टर अनदर (पॉल थॉमस अँडरसन), सर्वोत्कृष्ट मूळ गाणे – गोल्डन (के-पॉप डेमन हंटर्स) — ईजेएई, मार्क सोननब्लिक, जूंग ग्यू क्वाक, यू , सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजिनल स्कोर) – सिनर्स

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) – सिनर्स, सर्वोत्कृष्ट ध्वनी (साउंड) – एफ1, सर्वोत्कृष्ट माहितीपट (डॉक्युमेंटरी फीचर फिल्म) – मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतिन, सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट (डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म) – ऑल द एम्प्टी रूम्स, र्वोत्कृष्ट दृश्य परिणाम (व्हिज्युअल इफेक्ट्स) – अवतार: फायर अँड ऍश, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन – फ्रँकेंस्टाइन, सर्वोत्कृष्ट कास्टिंग – वन बॅटल आफ्टर अनदर, सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – द सिंगर्स अँड टू पीपल एक्सचेंजिंग सलाईवा, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म – के-पॉप डेमन हंटर्स, सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – द गर्ल हू क्राइड पर्ल्स, सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलिंग – फ्रँकेंस्टाइन, सर्वोत्कृष्ट वेशभूषा रचना (कॉस्ट्यूम डिझाइन) – फ्रँकेंस्टाइन

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande