
अकोला, 19 मार्च (हिं.स.) : अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत हिवरखेड पोलीस ठाणे हद्दीत गुटखा विक्री व साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी 19 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी अब्दुल मुसद्दिक अब्दुल नजीक (वय 23 वर्षे, रा. पेठपुरा, हिवरखेड) याच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व गुटखा असा एकूण ₹73,240/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध कलम 223, 274, 275, 123 BNS तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांविषयी माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे