चंद्रपुरात ३७१७ कोटींच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी कंपनीचा संचालक अटकेत
चंद्रपूर, 19 मार्च, (हिं.स.)। VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीच्या संचालकाला इंटरनेट डिव्हाइस डेटा सेंटरमधील क्लाउड पार्टिकल खरेदी करून भाड्याने देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून चंद्र
चंद्रपुरात ३७१७ कोटींच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी कंपनीचा संचालक अटकेत


चंद्रपूर, 19 मार्च, (हिं.स.)। VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीच्या संचालकाला इंटरनेट डिव्हाइस डेटा सेंटरमधील क्लाउड पार्टिकल खरेदी करून भाड्याने देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर कंपनीच्या विविध बँक खात्यांमधून तब्बल ३७१७ कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे तपासात समोर आले आहे.

इंटरनेट डिव्हाइस डेटा सेंटरमधील क्लाउड पार्टिकल खरेदी करून ते भाड्याने देऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या VUENOW MARKETING SERVICES LIMITED या कंपनीच्या संचालकाविरोधात चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कंपनीचा मुख्य संचालक सुखवेदरसिंग हकमसिंग खरौर (रा. मोहाली, पंजाब) याला ११ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी संचालकाने गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या १४ बँक खात्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून एकूण ३७१७ कोटी ३० लाख ८२ हजार ९४७ रुपये इतकी प्रचंड आर्थिक उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande