आयपीएल २०२६: जॉन मूनी यांची दिल्ली कॅपिटल्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती
नवी दिल्ली, १९ मार्च (एचएस)इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्सने (डीसी) आपला प्रशिक्षण संघ आणखी मजबूत केला आहे. फ्रँचायझीने आयर्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू जॉन मूनी यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
जॉन मूनी

मूनी हे अँटोन रॉक्स आणि ज्ञानेश्वर राव यांची जागा घेतील, ज्यांनी गेल्या हंगामात हे पद भूषवले होते. ४४ वर्षीय मूनी यांनी यापूर्वी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानसोबत काम केले आहे. ते मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षण चमूमध्ये सामील झाले आहेत, ज्यात इयान बेल सहाय्यक प्रशिक्षक, मुनाफ पटेल गोलंदाजी प्रशिक्षक आणि वेणुगोपाल राव क्रिकेट संचालक म्हणूनही आहेत.

मूनी यांनी आयर्लंडसाठी ६४ एकदिवसीय आणि २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ९६३ धावा आणि टी-२० मध्ये २३१ धावा केल्या. या क्रिकेटपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७ विकेट्स आणि टी-२० मध्ये १० विकेट्स आहेत.

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ १ एप्रिल रोजी लखनौ येथील एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेला सुरुवात करणार आहे. दिल्लीला अद्याप आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही आणि ते आपल्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

 rajesh pande