
मुंबई, 19 मार्च (हिं.स.)। महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड या महिंद्रा समुहातील रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनीने मुंबईतील कांजूर येथील एलबीएस मार्गावर ‘महिंद्रा रेनफॉरेस्ट’ या प्रीमियम मिश्र-वापर प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची घोषणा आज येथे केली. हा प्रकल्प सुमारे २५.४७ एकर परिसरात पसरलेला असून, मुंबईच्या मध्य उपनगरांतील मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प एकत्रित जीवनशैली देणारा असा विकसित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
या निवासी टप्प्यांची एकूण विकास किंमत (जीडीव्ही) अंदाजे ३,००० कोटी रुपये आहे. मोठ्या मिश्र-वापर प्रकल्पाचा भाग असलेला ‘महिंद्रा रेनफॉरेस्ट’ हा प्रकल्प निवासी, व्यावसायिक आणि रिटेल सुविधा एकाच ठिकाणी एकत्र आणून शहरातील राहणीमानाला नवा आयाम देण्यासाठी तयार करण्यात येत आहे. या टप्प्यांमधील निवासी टाउनशिपमध्ये आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन नीट नियोजन केलेली २ आणि ३ बीएचकेची प्रीमियम घरे असतील. हिरवळीच्या जागा, समुदायासोबत राहण्याची संकल्पना आणि शाश्वत (पर्यावरणपूरक) डिझाइन यांना येथे विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हवामानाशी सुसंगत नियोजन आणि जीवनमान सुधारण्यावर भर देत हा प्रकल्प ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ची घरे उभारण्याच्या महिंद्रा लाइफस्पेसच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना ‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड’चे निवासी विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी विमलेन्द्र सिंह म्हणाले, “मुंबई ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील मध्य उपनगर हे चांगली कनेक्टिव्हिटी व विकसित सामाजिक सुविधा यामुळे राहण्यासाठीचे महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. ‘महिंद्रा रेनफॉरेस्ट’द्वारे ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ची घरे ही आमची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात आणत आहोत. हा एक मोठा मिश्र-वापर प्रकल्प असून, यात निसर्ग, सुयोग्य डिझाइन आणि दैनंदिन गरजा यांचा सुंदर मेळ आम्ही घातला आहे. आमचा उद्देश फक्त घरे बांधण्याचा नाही, तर हिरवळ, सामुदायिक अनुभव आणि शाश्वत नियोजन यांचा अर्थपूर्ण संगम असलेले राहण्याचे वातावरण तयार करण्याचा आहे. आम्हाला विश्वास आहे की ‘महिंद्रा रेनफॉरेस्ट’ हा प्रकल्प मध्य उपनगरात नियोजनबद्ध, प्रीमियम आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनशैलीसाठीचा नवा मापदंड ठरेल.”
कांजूर येथे एलबीएस मार्गावरील हा प्रकल्प पूर्व द्रूतगती मार्ग, जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोड आणि आगामी गोरेगाव–मुलुंड लिंक रोड व भांडुपमधील पूर्व–पश्चिम जोडणारा फ्लायओव्हर या सर्वांशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या शेजारीच ‘मेट्रो लाईन-४’ असल्याने रहिवाशांना त्याचा थेट फायदा होईल. तसेच ‘मेट्रो लाईन-६’ आणि उपनगरी रेल्वे नेटवर्क यांची कनेक्टिव्हिटीही येथून सुलभरित्या मिळेल. या परिसरातून बीकेसी आणि पवईसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक भागांपर्यंत सहज पोहोचता येते. याशिवाय, चांगल्या शाळा, रुग्णालये, मॉल्स आणि मनोरंजन केंद्रे अशा सर्व आवश्यक सुविधा जवळच उपलब्ध आहेत. येथील घरे आधुनिक पद्धतीने नीट नियोजन करून तयार केलेली आहेत. भरपूर नैसर्गिक प्रकाश, प्रशस्त खोल्या, मोठे डेक (बाल्कनीसारखी जागा) आणि स्वतंत्र प्रवेशभाग यामुळे येथे राहण्याचा अनुभव अधिक आरामदायी आणि प्रीमियम बनतो.
या मोठ्या प्रकल्पाचा भाग म्हणून, या निवासी टाउनशिपमध्ये ३.५ लाख चौ. फूटांपेक्षा जास्त ओपन अॅमेनिटीज आणि क्लबहाऊसची जागा असेल. मुंबईतील अशा मोठ्या जागांपैकी ही एक मानली जाते. तसेच या प्रकल्पात ७ एकरांपेक्षा जास्त दाट हिरवळीच्या मोकळ्या जागा असणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मोठे क्लबहाऊस, फिटनेस झोन, जॉगिंग ट्रॅक, योगा आणि ध्यानासाठी जागा, लायब्ररी, मुलांसाठी खेळण्याच्या जागा आणि नीट नियोजन केलेली सामुदायिक जागा अशा सुविधा असतील. दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या रिटेल सुविधादेखील या प्रकल्पातच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कांजूरमधील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा ‘महिंद्रा रेनफॉरेस्ट’ हा प्रकल्प मुंबईच्या मध्य उपनगरांना आधुनिक, प्रीमियम आणि आकर्षक निवासी क्षेत्र बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर