नोरा फतेही आणि संजय दत्तसह 5 जणांना महिला आयोगाचे समन्स
-''सरके चुनर तेरी सरके'' गीतातील अश्लीलते संदर्भात कारवाई नवी दिल्ली,19 मार्च (हिं.स.) : ''सरके चुनर तेरी सरके'' याअश्लील गाण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच अ
नोरा फतेही व संजय दत्त यांचे छायाचित्र


-'सरके चुनर तेरी सरके' गीतातील अश्लीलते संदर्भात कारवाई

नवी दिल्ली,19 मार्च (हिं.स.) : 'सरके चुनर तेरी सरके' याअश्लील गाण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्तसह 5 जणांना समन्स बजावले आहे. आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

राष्ट्रीय महिला आयोगाने अधिनियम 1990 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत “सरके चुनर तेरी सरके” या गाण्यात अश्लीलता आणि अभद्रता असल्याच्या आरोपांवर आधारित माध्यमांतील बातम्यांवरून स्वतःहून (सुमोटो) कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता संजय दत्त, रकीब आलम, केवीएन समूहाचे निर्माता वेंकट के. नारायण आणि दिग्दर्शक किरण कुमार यांना आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. आयोगाच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, संबंधित गाणे लैंगिक उत्तेजक, आक्षेपार्ह असून भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्याने घेतले जात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. संबंधित सर्वांना 24 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता आवश्यक कागदपत्रांसह आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुपस्थित राहिल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय महिला आयोगाने दिला आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande