जळगाव - व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; एकाला अटक
जळगाव, 19 मार्च (हिं.स.)अमळनेरमध्ये भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून हल्ला करत लाखोंची रोकड लुटून पोबारा करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात धुळे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला अटक
जळगाव - व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; एकाला अटक


जळगाव, 19 मार्च (हिं.स.)अमळनेरमध्ये भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून हल्ला करत लाखोंची रोकड लुटून पोबारा करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात धुळे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी पिंपळे रोड परिसरात ही घटना घडली होती.

अमळनेर येथील लामा जिनिंगचे मालक यतिन कोठारी हे दुचाकीवरून सुमारे 5 लाख 27 हजार रुपयांची रक्कम घेऊन जात असताना तिघांनी त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून रोख रकमेची बॅग हिसकावून पलायन केले होते. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान मनोज ऊर्फ खुशाल मोकळ या आरोपीचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली असून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर आरोपीकडून सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून उर्वरित रक्कम आणि इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित आरोपी हा पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून यापूर्वीही लुटीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande