झायडस आणि टॉरंट फार्मा यांच्यात करार; सेमॅग्लुटाइड इंजेक्शन सहज उपलब्ध होणार
मुंबई, 19 मार्च (हिं.स.)।आपल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या झायडस लाइफलायन्सेस लिमिटेड या आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती कंपनीने टॉरेंट फार्माक्युटिकल्स या आंतरराष्ट्रीय औषध निर्माता कंपनीसोबत नवा करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी भार
Zydus


मुंबई, 19 मार्च (हिं.स.)।आपल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी जगभरात नावाजलेल्या झायडस लाइफलायन्सेस लिमिटेड या आंतरराष्ट्रीय औषध निर्मिती कंपनीने टॉरेंट फार्माक्युटिकल्स या आंतरराष्ट्रीय औषध निर्माता कंपनीसोबत नवा करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात सेमॅग्लटाइड इंजेक्शन सह-विपणनासाठी परवाना आणि पुरवठा करार केला आहे. या भागीदारीअंतर्गत, दोन्ही कंपन्या भारतीय बाजारपेठेत या अत्याधुनिक औषधाची विक्री करणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या करारामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक उपचारपद्धती सहजरित्या उपलब्ध होण्यास मदत होईल.

करारानुसार, झायडस या इंजेक्शनच्या उत्पादनाची आणि पुरवठ्याची जबाबदारी घेईल. टॉरंट फार्माला सहमार्टिंग करता येत असल्याने कंपनी सेम्बोलिक या स्वतःच्या ब्रँण्डच्याय नावाने हे इंजेक्शन भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करेल. दीर्घकालीन आजारांचे यशस्वी उपचार उपलब्ध करुन देण्यात टॉरंट कंपनीचा दांडगा अनुभव आहे. कंपनीचे देशभरात पसरलेले विस्तृत जाळे लक्षात घेता हे औषध अनेक रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल, असा या करारामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

झायडस कंपनी स्वतःच्या ‘सेमॅग्लिन्ट’,’मॅशेमा’ आणि ‘अल्टरमेट’ या ब्रँण्ड नावांनी हे उत्पादन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देईल. तर टॉरंट फार्माकडून ‘सेम्बोलिक’या नावाने हे उत्पादन विकले जाईल. करारानुसार, टॉरंट फार्मा कंपनी सुरुवातीला झायडसला परवाना शुल्क अदा करणार आहे.

झायडसने सेमॅग्लुटाइड इंजेक्शनचे (१५ मिग्रॅ प्रति ३ मिली) हे नाविन्यपूर्ण स्वरुप विकसित केले असून, हे इंजेक्शन प्री-फिल्ड कार्टिजमध्ये उपलब्ध असेल. हे इंजेक्शन रुग्णांना सहज वापरता येईल अशा पुनर्वापर करता येणा-या पेन डिव्हाइसद्वारे दिले जाते. हे पेन डिव्हाइस वापरण्यासही सोपे आहे. या डिव्हाइच्या मदतीने औषध घेण्यात नियमितता येते. रुग्णांना उपचारपद्धती अवलंबण्यास कोणताही अडथळा येत नाही. परिणामी, दीर्घकालीन उपचारांमध्ये सातत्यता राखण्यास मदत होते. यामुळे रुग्णाचे जीवनमान सुधारते.

सेमॅग्लुटाइड हे प्रामुख्याने प्रौढ वयोगटातील रुग्णांच्या उपचारांसाठी सूचवले जाते. बरेचदा टाईप २ मधुमेहाशी झगडणा-या या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित राहते. सकस आहार आणि व्यायामानंतर या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते. हे औषध आहार आणि व्यायामासोबत सहाय्यक उपचार म्हणून दिले जाते.:

o मेटाफॉर्मिन औषधाच्या सेवनाने उपचारपद्धतीत सकारात्मक परिणाम दिसून येत नसल्यास किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे उपचारपद्धतीत बाधा येत असल्यास डॉक्टर्स सेमॅग्लुटाइड इंजेक्शन सूचवतात.

o मधुमेहाच्या उपचारासाठी वापरल्या जाणा-या इतर औषधांसोबतही पूरक उपचार म्हणून सेमॅग्लुटाइड औषध दिले जाते.

हे औषध प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या कारणांसाठी वापरले जाते. टाईप २ मधुमेहाशी झगडणा-या प्रौढ वयोगटातील रुग्णाला आहार आणि व्यायामानेही वजनावर नियंत्रण मिळवता येत नसेल अशा रुग्णांसाठी हे इंजेक्शन प्रभावी ठरते. ही एक सहाय्यक उपचारपद्धती मानली जाते. वजन नियंत्रणासाठीही हे औषध फायदेशीर ठरते. ३० पेक्षा अधिक ब़ॉडी मास्क इंडेक्स किंवा २७ पेक्षा अधिक बीएमआय असलेल्या रुग्णांना वाढत्या वजनामुळे रक्तदाब, टाईप २ मधुमेह आणि अतिरिक्त चरबीचा सामना करणा-या रुग्णांनाही हे औषध सूचवले जाते.

या करारामुळे झायडसची अत्याधुनिक उत्पादन संशोधन क्षमता आणि टॉरंट फार्माचा भारतीय बाजारपेठेतील दांडगा अनुभव या दोघांनाही एक व्यासपीठ मिळाले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून चयापचयाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आधुनिक जीएलपी-१ उपचार पद्धती सहजरित्या उपलब्ध करुन देणे दोन्ही कंपन्यांना शक्य होणार आहे. हेच या दोन्ही कंपन्यांचे सामायिक ध्येय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande