आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
-मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवणार-प्रद्युत बोरदोलोई यांना दिसपूरमधून उमेदवारी नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.)भाजपने आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ८८ उमेदवारांच्या
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर


-मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवणार-प्रद्युत बोरदोलोई यांना दिसपूरमधून उमेदवारी

नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.)भाजपने आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ८८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनुसार, प्रद्युत बोरदोलोई यांना दिसपूर जागेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. बोरदोलोई हे नागाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार होते आणि त्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. बुधवारी बोरदोलोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांच्या नावाचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा राज्यातील जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी झाली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. १२६ विधानसभा जागा असलेल्या आसाममध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी होईल.

हिमंता बिस्वा सरमा यांनी जालुकबारी जागा सलग पाच वेळा जिंकली आहे. भाजपच्या यादीत सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. बिहपुरिया जागेसाठी आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत रणजित कुमार दास, अशोक सिंघल, अजंता निओग, चंद्र मोही पटवारी, रणोज पेगू, संजय किशन, पीयूष हजारिका आणि बिमल बोरा यांचाही समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande