
नवी दिल्ली, 19 मार्च (हिं.स.) माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, नुकतेच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग, बीसीसीआयचे 'क्रिकेट ऑफ एक्सलन्स'चे प्रमुख आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियाद्वारे देशवासियांना गुढीपाडवा आणि उगादीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकरने आपल्या एक्स अकाउंटवर लिहिले, तुम्हाला व कुटूंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना करतो. सूर्यकुमार यादवने लिहिले, नव्या स्वप्नांसह एका नव्या सुरुवातीचे स्वागत करा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येवो. अनिल कुंबळे यांनी लिहिले, उगादीच्या या शुभप्रसंगी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
हरभजन सिंगने एक्स अकाउंटवर लिहिले, नवीन वर्ष, नवी ऊर्जा, एक नाते. आपण आरोग्याने, परंपरेने, तुमच्यामुळे जोडलेले आहोत. उगादी आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले, नवीन वर्ष. अनेक परंपरा. उगादी, गुढी पाडवा, चेटी चांद, नवरेह, साजिबू नोंगमा पानबा यांच्या हार्दिक शुभेच्छा. विविधतेतील एकतेचा उत्सव. सर्वांना नवीन सुरुवात आणि अमर्याद संधींच्या शुभेच्छा.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे