अकोला - नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी घेतली आढावा बैठक
अकोला, 02 मार्च (हिं.स.)। आज सायंकाळी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे महापौर सौ.शारदा रणजीत खेडकर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपमहापौर अमोल गोगे, सभागृहनेता पवन महल्ले, नगरसेवक सिध्दार्थ उपरवट, हर्षद भांबेरे यांच्या प्रम
Photo


अकोला, 02 मार्च (हिं.स.)। आज सायंकाळी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे महापौर सौ.शारदा रणजीत खेडकर, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, उपमहापौर अमोल गोगे, सभागृहनेता पवन महल्ले, नगरसेवक सिध्दार्थ उपरवट, हर्षद भांबेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृह येथे मनपा सर्व विभागांची आढावा सभा घेण्यात आली.

यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी, शासन आणि प्रशासन दोन्ही सोबत आपसात समन्वय साधून संपूर्ण शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जायचा आहे. अकोला शहरातील नागरिकांना मनपाव्दारे पुरविण्यात येणा-या मुलभूत सोई-सुविधा हे सर्वोत्कृष्ट व अविरत पुरवायची आहे, यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे. तसेच सद्यास्थितीत मनपाचे आर्थिक उत्पन्न असलेले स्त्रोत मधून वसुलीचे प्रमाण वाढवून आणि खर्चांमध्ये कसाटकसर करून याचसोबत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोतांमध्ये वाढ करून मनपाची आर्थिक परिस्थिती सुधरायची आहे असे आपल्या मनोगतात म्हटले आहे.

यानंतर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन, शहरात होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या अपव्यय टाळणे, शहरात दैनंदिन पाणी पुरवठा करण्याच्या दिशेने कार्य करणे, शहरात बंद पडलेले हॅण्डपंप आणि सबमर्शिबल पंपांची दुरूस्ती करणे, ज्या नळ धारकांचे नळाचे मीटर नादुरूस्त किंवा बंद असतील त्याबाबत संबंधीतांना नोटीसेस देऊन ते बदलण्यात यावे, शहरात ज्या भागात गढूळ पाणी येत असेल त्या भागातील लिकेजेस दुरूस्त करावे गरज असल्यास पाण्याची टाकी स्वच्छ करावी, चारही क्षेत्राचे सहा.आयुक्त यांनी अवैध नळ जोडणी खंडीत करण्याच्या कारवाई मध्ये सहकार्य करावे आणि पाणीवपट्टी वसुलीची संयुक्त मोहीम राबविण्यासाठी नियोजन करावे, शहरातील मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदी सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव मार्गी लावणे, शहरामध्ये 35 ते 38 टक्के स्लम भाग असून त्याच्याव्दारे प्राप्त तक्रारींचे निराकरण तातडीने करावे, शहरात मनपाची जागा शोधून अहावाल सादर करणे, अतिक्रमण विभागानी आपले शहर अतिक्रमण मुक्त करणे, शहरातील पार्कींगची जागा आयडन्टीफाय करणे, शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फव्वारणीची व्यवस्था करणे, मोर्णा नदीतील वाढत असलेली जलकुंभी काढण्याचे नियोजन करणे, नव्याने लावण्यात आलेल्या खांब्यांवर पथदीप लावणेसाठीचा प्रस्ताव तयार करणे, दिवसा सुरू राहणा-या पथदिव्यांची व्यवस्था करणे, मनपात नोंद असलेले जन्म दाखले देण्याची कारवाई दोन दिवसात पुर्ण करणे, तसेच मोटर वाहन विभागांतर्गत असलेले कॉम्पेक्टर हे बिना अनुभव असलेले चालक चालवित असल्याने ते वारंवार खराब होत असतात त्यासाठी कंपनीच्या तज्ञांकडून त्यांना प्रशिक्षण देणे, जेसीबीचे चालक कामावर उशीरा येत असल्याने स्वच्छतेचे काम बाधित होत असून वाहन चालकांची दोन शीफ्ट मध्ये व्यवस्था करावी, कचरा उचलणा-या ट्रॅक्टर चे फालकांची दुरूस्ती करावी, रस्त्यावर बांधण्यात येणा-या म्हशी मालकांवर कारवाई करणे, शहरात सुरू असलेले अनधिकृत बांधकाम शोधण्यासाठी झोन कार्यालय येथे अभियंत्यांची आवश्यकतानुसार संख्या वाढविणे, नागरिकांच्या ऑनलाईन येणा-या तक्रारी तात्काळ निकाली काढणे आदिंबाबत सुचना दिली.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, मुख्य लेखा परिक्षक जगदीश मानमोठे, उपायुक्त विजय पारतवार, दिलीप जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे यांचेसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande