हिजबुल्लाहची इस्रायलवर रॉकेट-ड्रोन हल्ल्यांची कबुली
बेरूत, 02 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलतर्फे इराणवर सातत्याने हल्ले सुरू आहेत, तर इराणही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. अमेरिका-इस्रायलसो
हिजबुल्लाहची इस्रायलवर रॉकेट-ड्रोन हल्ल्यांची कबुली


बेरूत, 02 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलतर्फे इराणवर सातत्याने हल्ले सुरू आहेत, तर इराणही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मध्य पूर्वेतील तणाव सातत्याने वाढत आहे. अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षात लेबनानमध्ये कार्यरत असलेली इराणसमर्थित उग्रवादी संघटना हिजबुल्लाहही आता सहभागी झाली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

वृत्तसंस्थाच्या अहवालानुसार, हिजबुल्लाहने निवेदन जारी करून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती दिली आहे. हिजबुल्लाहने म्हटले आहे की, “अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, लेबनान आणि तेथील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी तसेच इस्रायलच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला.”

इस्रायलच्या सैन्यानेही हिजबुल्लाहच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायली सैन्याने सांगितले की सोमवारी संपूर्ण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायली सैन्याने निवेदनात म्हटले आहे की, “इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेल्या रॉकेट्सच्या प्रत्युत्तरात इस्रायली सैन्याने लेबनानमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई सुरू केली आहे.”

इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, सीमापार डागण्यात आलेली अनेक रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात आली, तर काही रॉकेट्स निर्जन भागात पडली. या हल्ल्यांमध्ये कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande