कुवैतने अमेरिकेची तीन एफ-15E लढाऊ विमाने चुकून पाडली, अमेरिकेची कबुली
वॉशिंग्टन, 02 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायल एकत्र इराणमध्ये विनाश घडवण्यासाठी काम करत असताना या युद्धादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुवैतने अमेरिकेची तीन एफ-15E लढाऊ विमाने पाडल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन लष्कराने याची पुष्टी
कुवैतने अमेरिकेची तीन एफ-15E लढाऊ विमाने चुकून पाडली, अमेरिकेची कबुली


वॉशिंग्टन, 02 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायल एकत्र इराणमध्ये विनाश घडवण्यासाठी काम करत असताना या युद्धादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुवैतने अमेरिकेची तीन एफ-15E लढाऊ विमाने पाडल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन लष्कराने याची पुष्टी करत सांगितले की, लढाईदरम्यान चुकून कुवैतकडून अमेरिकेची तीन एफ-15E स्ट्राइक ईगल विमाने पाडली गेली.मात्र, सर्व सहा क्रू मेंबर्स सुरक्षितपणे बाहेर पडले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ही ‘फ्रेंडली फायर’ घटना नेमकी कशामुळे घडली याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू असून लवकरच अधिक माहिती शेअर केली जाईल. तसेच, इराणविरोधातील ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ दरम्यान दिलेल्या सहकार्याबद्दल कुवैती सैन्याचे आभारही मानण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “सक्रिय लढाईदरम्यान — ज्यामध्ये इराणी विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांचा समावेश होता — अमेरिकन एअर फोर्सचे लढाऊ विमान कुवैतच्या हवाई संरक्षण प्रणालीकडून चुकून पाडले गेले.”

पुढे असेही नमूद करण्यात आले की, “सर्व सहा क्रू मेंबर्स सुरक्षितपणे बाहेर पडले असून त्यांना सुरक्षितरीत्या परत आणण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुवैतने ही घटना मान्य केली असून, सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही कुवैती संरक्षण दलाचे आभारी आहोत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande