तालिबानचा पाकिस्तानवर हवाई हल्ल्याचा दावा
काबुल, 02 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. तालिबान प्रशासनाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राइकला
तालिबानचा पाकिस्तानवर हवाई हल्ल्याचा दावा


काबुल, 02 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. तालिबान प्रशासनाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देताना रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि क्वेटा येथील १२वी कोरवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या अफगाण तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की पाकिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर यशस्वी हवाई कारवाई करण्यात आली. तालिबानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने यापूर्वी काबूल आणि बगराम एअरबेसला लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानच्या तालिबान संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, त्यांच्या वायुसेनेने रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटा येथील १२वी कोर, खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहम्मद एजन्सी परिसर तसेच घलानी येथील लष्करी तळांना लक्ष्य केले. या ठिकाणांवर अचूक आणि समन्वित हवाई हल्ले करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, या दाव्यांवर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या घडामोडींमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंधांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande