
मुंबई, 20 मार्च (हिं.स.) - एचएसबीसी म्युच्युअल फंडने एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड (एफओएफ) लाँच करण्याची घोषणा केली आहे. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करेल. या लाँचसह एचएसबीसी म्युच्युअल फंडने भारतात पहिल्यांदाच ईटीएफ क्षेत्रात प्रवेश केला आहे. या न्यू फंड ऑफर (एनएफओ) योजना या आठवड्यापासून गुंतवणुकीसाठी खुल्या होत आहेत.
एनएफओ कालावधी : एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड - १९ ते २५ मार्च २०२६
या फंडचे व्यवस्थापन एचएसबीसी म्युच्युअल फंडचे दिपन पारेख यांच्याद्वारे केले जाईल. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करेल आणि या योजनेची कामगिरी सोन्याच्या देशांतर्गत किमतींच्या तुलनेत मोजली जाईल. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करेल. हे फंड गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची सोयीस्कर संधी उपलब्ध करून देतात.
एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडच्या एनएफओ कालावधी दरम्यान गुंतवणूकदार किमान ५,००० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकतात. एचएसबीसी गोल्ड ईटीएफचे ट्रॅकिंग एरर्सच्या अधीन राहून खर्चापूर्वी गुंतवणुकीचे सोन्याच्या देशांतर्गत किमतींच्या कामगिरीचा मागोवा घेण्याचे उद्दिष्ट आहे, तर एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडचे एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून मिळणाऱ्या परताव्याच्या अनुषंगाने परतावा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडमध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष एकरकमी, एसआयपी, एसआयपी टॉप-अप, एसटीपी आणि एसडब्ल्यूपी पर्यायांद्वारे एएमसीसह गुंतवणूक करू शकतात. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ एफओएफ आपल्या एकूण मालमत्तेपैकी किमान ९५ टक्के गुंतवणूक एचएसबीसी गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये करेल आणि ५ टक्क्यांपर्यंत मालमत्ता डेब्ट किंवा मनी मार्केट सिक्युरिटीज/फंड्समध्ये ठेवू शकेल. सोन्याचा सध्याचा भाव किंवा या मालमत्ता वर्गाचा भविष्यातील कल काहीही असला तरीही ही योजना अंतर्निहित योजनेत गुंतवणूक कायम ठेवेल.
या लाँचबाबत मत व्यक्त करत एचएसबीसी म्युच्युअल फंडचे सीईओ कैलास कुलकर्णी म्हणाले, ''भारतातील घराघरांमध्ये दीर्घकाळापासून महत्त्वाचे स्थान असलेले सोने आता गुंतवणुकीचे मालमत्ता वाटप करण्यासाठी महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जात आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे शक्य झाले आहे. बाजारपेठेतील अस्थिरतेविरुद्ध संरक्षण म्हणून काम करण्याची सोन्याची अद्वितीय क्षमता सोन्याला दीर्घकालीन मालमत्ता जतन करण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक बनवते. आमच्या गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून गुंतवणूकदार आता प्रत्यक्ष सोने साठवण्याच्या किंवा हाताळण्याच्या गुंतागुंतीशिवाय सोन्यातील गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात. हा दृष्टिकोन गुंतवणूकदारांना अधिक स्थिर पोर्टफोलिओ तयार करण्यास आणि आत्मविश्वासाने आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करतो.''
एचएसबीसी म्युच्युअल फंडचे इक्विटीचे सीआयओ वेणुगोपाल मंगत म्हणाले, ''सोन्याचा इक्विटीशी असलेला कमी संबंध सोन्याला मौल्यवान विविधता आणणारा घटक आणि बाजारपेठेत मोठी अस्थिरता असताना प्रभावी सुरक्षा कवच बनवतो. सोन्यामध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करत गुंतवणूकदार आपल्या एकूण पोर्टफोलिओचा जोखीम आणि दीर्घकालीन स्थिरतेचे व्यवस्थापन करू शकतात. एचएसबीसी गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंडच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना देशांतर्गत सोन्याच्या किमतीतील बदलांचा लाभ घेण्यासाठी कार्यक्षम आणि स्थिर मार्ग उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे त्यांच्या व्यापक वैविधीकरण आणि जोखीम व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांना मदत होईल.
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक का करावी
अस्थिरतेविरुद्ध संरक्षण : इतर मालमत्ता वर्गांशी असलेला सोन्याचा कमी संबंध पाहता बाजारपेठेतील अस्थिरतेविरुद्ध सोने प्रभावी सुरक्षा कवच म्हणून काम करू शकते.
कामगिरीचे अनुकूलन : मालमत्ता वर्गांचे योग्य मिश्रण दीर्घकाळापर्यंत अनुकूल परिणाम मिळवण्यास मदत करू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी