एसबीआय म्युच्युअल फंडची आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर
नवी दिल्ली, 20 मार्च (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) सादर केला आहे. कंपनी आयपीओद्वारे निधी
SBI Mutual Fund Files Draft Papers


नवी दिल्ली, 20 मार्च (हिं.स.)। देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) सादर केला आहे. कंपनी आयपीओद्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे.

भांडवली बाजार नियामक सेबीकडे दाखल केलेल्या डीआरएचपीनुसार, हा आयपीओ पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' (ओएफएस) वर आधारित असून, यामध्ये २०.३७ कोटी इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट या आयपीओद्वारे आपला हिस्सा विकणार आहे. एसबीआय आणि पॅरिस-स्थित अमुंडी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडकडे अनुक्रमे ६१.९८ टक्के आणि ३६.४० टक्के हिस्सा आहे.

कंपनीने या इश्यूचे व्यवस्थापन करण्यासाठी मर्चंट बँकर्सच्या एका गटाची नियुक्ती केली आहे. यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया), आयसीआयसीआय सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया, जेएम फायनान्शियल, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स यांचा समावेश आहे.

डिसेंबर २०२५ पर्यंत, ही कंपनी देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन संस्था असून, तिच्या व्यवस्थापनाखालील तिमाही सरासरी मालमत्ता अंदाजे १२.५ लाख कोटी रुपये आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे प्रायोजित आणि १९८७ मध्ये स्थापित एसबीआय म्युच्युअल फंड हा भारतातील पहिला नॉन-यूटीआय म्युच्युअल फंड आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande