१ कोटींची बनावट दारू पकडली; नेरळ पोलिसांची तस्करांवर कारवाई
रायगड, 22 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई करत १ कोटी १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थान येथील आरोपीला अटक करण्यात आली असून दारू तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्य
Fake liquor worth 1 crore seized; Neral police crack down on smugglers


रायगड, 22 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई करत १ कोटी १ लाख २७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थान येथील आरोपीला अटक करण्यात आली असून दारू तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे दि. 21 मार्च 2026 रोजी रात्री 11:15 वाजता कर्जत-मुरबाड रोडवरील वारे गाव हद्दीत ‘कोकण किनारा हॉटेल’ समोर सापळा रचण्यात आला.या वेळी आरोपी दादूराम शिखाराम बिश्नोई (वय 42, रा. राजस्थान) हा टाटा टँकर (क्र. GJ 12 AW 4421) मधून विनापरवाना गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना पकडला गेला. टँकरमध्ये गुप्त कप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सीलबंद दारू साठवलेली आढळली.

जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये

-

430 बॉक्स एव्हरग्रीन फ्रीज व्हिस्की (51,060 बाटल्या)

-

179 बॉक्स मोबी व्होडका ऑरेंज (2,141 बाटल्या)

-

190 बॉक्स मोबी व्होडका ग्रीन अॅपल (2,280 बाटल्या)

असा मोठा साठा असून टँकरसह एकूण किंमत १ कोटीहून अधिक आहे.

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 59/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आचल दलाल (पोलीस अधीक्षक), अभिजीत शिवतरे (अपर पोलीस अधीक्षक), राहुल गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटेे (नेरळ पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सुशील शेंबडे आदींनी यशस्वीपणे कर्त्यव्य बजावले.

या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande