नवीन स्कोडा कुशाक फेसलिफ्ट भारतात लाँच
मुंबई, 22 मार्च (हिं.स.)। भारतीय वाहन बाजारात स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचा अपडेटेड अवतार म्हणजेच 2026 स्कोडा कुशाक फेसलिफ्ट अधिकृतपणे लाँच केला आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये ठेवण्यात आली असून टॉ
New Skoda Kushaq Facelift Launched


मुंबई, 22 मार्च (हिं.स.)। भारतीय वाहन बाजारात स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या लोकप्रिय एसयूव्हीचा अपडेटेड अवतार म्हणजेच 2026 स्कोडा कुशाक फेसलिफ्ट अधिकृतपणे लाँच केला आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये ठेवण्यात आली असून टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 18.99 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

डिझाइनच्या बाबतीत पाहता, नवीन कुशाक फेसलिफ्टमध्ये कंपनीने काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे गाडी अधिक प्रीमियम आणि आकर्षक दिसते. फ्रंट लूकमध्ये रुंद फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे, ज्यामध्ये काही व्हेरिएंटमध्ये इनबिल्ट लाईटबारचा समावेश आहे. याशिवाय नवीन बंपर आणि नव्या डिझाइनचे एलईडी हेडलॅम्प्स गाडीला अधिक आधुनिक स्वरूप देतात. साइड प्रोफाइलमध्ये नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर मागील बाजूस लाईटबार स्टाईल टेललॅम्प्स आणि नव्याने डिझाइन केलेला रिअर बंपर गाडीच्या एकूण लूकमध्ये भर घालतो.

इंटिरियरमध्ये मोठे स्ट्रक्चरल बदल नसले तरी कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहेत. ट्रिम फिनिश आणि सीट अपहोल्स्ट्रीमध्ये नवीन रंग पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीने मागील सीटसाठी सुधारित कुशनिंग दिल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळणार आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यात पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एआय व्हॉइस असिस्टंटसह अपडेटेड 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सेगमेंटमध्ये प्रथमच मागील सीटसाठी मसाज फंक्शन देखील देण्यात आले आहे, जे ग्राहकांसाठी मोठे आकर्षण ठरू शकते.

याशिवाय गाडीत पावर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सबवूफरसह स्कोडा साउंड सिस्टम यांसारखी फीचर्स आधीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहेत. ही एसयूव्ही एकूण पाच ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे – क्लासिक प्लस, सिग्नेचर, स्पोर्टलाइन, प्रेस्टिज आणि मॉन्टे कार्लो. विशेष म्हणजे बेस व्हेरिएंट देखील चांगल्या फीचर्सने सुसज्ज आहे. यात सनरूफ, 17 इंच अलॉय व्हील्स, ऑटो एलईडी हेडलॅम्प्स, ऑटो वायपर्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रिअर वायपर आणि डिफॉगर समावेश आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कंपनीने कोणताही मोठा बदल केलेला नाही. 1.0 टीएसआय आणि 1.5 टीएसआय पेट्रोल इंजिनचे पर्याय पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहेत. 1.0 लिटर टीएसआय इंजिनसोबत मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो, तर 1.5 लिटर टीएसआय इंजिनसोबत डीएसजी गिअरबॉक्स उपलब्ध आहे. मात्र, यावेळी कंपनीने एक महत्त्वाचा बदल करत 1.0 लिटर इंजिनसोबत नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे, जो पूर्वीच्या 6-स्पीड युनिटची जागा घेतो.

मायलेजच्या बाबतीतही ही गाडी स्पर्धात्मक आहे. 1.0 लिटर टीएसआय मॅन्युअल व्हर्जन सुमारे 19.66 किमी प्रति लिटर मायलेज देते, तर नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिकसह 1.0 लिटर इंजिनचे मायलेज 19.09 किमी प्रति लिटर आहे. 1.5 लिटर टीएसआय डीएसजी व्हर्जनचे मायलेज 18.72 किमी प्रति लिटर मायलेज देऊ शकते.

भारतीय बाजारात या नव्या स्कोडा कुशाक फेसलिफ्टचा थेट मुकाबला ह्युंदाई क्रेटा, मारुती ग्रँड विटारा, किआ सेल्टोस, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, होंडा एलिव्हेट आणि फोक्सवॅगन टायगुन सारख्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande