अमरावती: एमडी तस्करांवर मोक्का, एमपीडीए अंतर्गत कारवाईचे नियोजन
एमडी तस्करांवर आता मोक्का, एमपीडीए सूत्रधारांसह नातेवाइकांच्या मालमत्तेवरही ‘वॉच’ अमरावती, 23 मार्च (हिं.स.) एमडी ड्रग्स तस्करी आणि वापर करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यावर अंकुश लागावा, याकरिता पोलिसांनी मोठ्या
मुंबई येथील एमडी ड्रग्ज तस्कर डिलिव्हरी करताना जेरबंद दोन अटकेत,78 ग्रॅम एम डी जप्त


एमडी तस्करांवर आता मोक्का, एमपीडीए

सूत्रधारांसह नातेवाइकांच्या मालमत्तेवरही ‘वॉच’

अमरावती, 23 मार्च (हिं.स.) एमडी ड्रग्स तस्करी आणि वापर करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यावर अंकुश लागावा, याकरिता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. ड्रग्स प्रकरणात सातत्याने गुन्हे दाखल झालेल्यांवर मोक्का, एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे नियोजन पोलिसांनी सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले संशयित अजिम असद शेख (वय ३६, रा. माहिम वेस्ट, मुंबई) व शेख समीर शेख आमीर (वय २५, रा. गवळीपुरा, अमरावती) यांना गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिस कोठडीदरम्यान त्यांच्याकडून गोपनीय माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. त्यामुळे एमडी सेवन करणाऱ्यांची शेकडो नावे आतापर्यंत निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणे सुरू केले आहे. २०२६ वर्षाच्या पहिल्याच तीन महिन्यांत गुन्हे शाखेने एमडी ड्रग्स विक्री व बाळगण्यासंदर्भात सात गुन्हे दाखल केले असून, त्यात एकूण दोन किलो ३५२ ग्रॅम एमडी जप्त करून २८ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामधील काही संशयितांविरुद्ध दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा सर्वांची व त्यांच्या नातेवाइकांच्या स्थावर व जंगल मालमत्तेची माहिती जिल्हा निबंध कार्यालय, महानगरपालिका, तहसीलदार तसेच प्रादेशिक वाहन परिवहन विभाग यांच्याकडून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कटात सहभागी संशयित व त्यांच्या नातेवाइकांच्या बँकखात्यांची माहितीही पोलिसांनी मिळविली आहे. ही संपूर्ण माहिती अंतिम टप्प्यात आल्यावर प्रचलित कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया करण्यात येणार असून, कठोर कारवाई केल्या जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले. गुन्हे शाखेने अटक केलेल्या अजिम असद शेख (वय ३६) व शेख समीर शेख आमीरसह एमडी तस्करीच्या गुन्ह्यातील मुंबई येथील पुरवठादार सत्यम गणेश सोनवणे (वय ३६, नेताजीनगर, कुर्ला, मुंबई) याला अटक केली. अमरावती येथे मुंबईवरून ड्रग्स येत असून, मुंबईच्या तस्करांना एमडीचा पुरवठा हा राजस्थानच्या नागोर येथून केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande