‘सखे गं साजणी’चा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, 24 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि प्रवासाची नवी कहाणी घेऊन येणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, मित्रांसोबतच्या प्रवासावर केंद्रित असलेला हा मराठीतील एक वेगळा आणि ताजातवाना चि
‘सखे गं साजणी’ ट्रेलर प्रदर्शित; मित्रांसोबतच्या प्रवासावर आधारित मराठीतील अनोखा चित्रपट


मुंबई, 24 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि प्रवासाची नवी कहाणी घेऊन येणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, मित्रांसोबतच्या प्रवासावर केंद्रित असलेला हा मराठीतील एक वेगळा आणि ताजातवाना चित्रपट ठरत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून तीन मित्रांच्या प्रवासाची, त्यांच्या नात्यांची आणि भावनिक क्षणांची सुंदर झलक पाहायला मिळते. मजा, साहस आणि भावना यांचा सुरेख मिलाफ ट्रेलरमधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

याआधी चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून, त्यापैकी ‘सखे गं साजणी’ शीर्षक गीताने मिलियनमध्ये प्रेक्षकसंख्या गाठत प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. हे गाणे अभिजीत सावंत यांनी गायले असून, संगीत विजय भाटे यांनी दिले आहे. गीतकार लखन चौधरी यांच्या शब्दांनी या गाण्याला भावनिक आणि उत्साही रंग दिला आहे.

तसेच, ‘डीजे चा बास’ हे आणखी एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे करण सावंत आणि श्वेता ठाकूर यांनी गायले असून, त्याचे संगीतही विजय भाटे यांनी दिले आहे. या गाण्याचे शब्द लखन चौधरी यांनी लिहिले आहेत. दोन्ही गाण्यांमधून चित्रपटातील मैत्री, उत्साह आणि प्रवासाचा जल्लोष अनुभवायला मिळतो.

‘सखे गं साजणी’ हा चित्रपट मैत्री, प्रवास आणि आयुष्यातील खास क्षणांची गोष्ट मांडणारा असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि आनंददायी अनुभव देण्यास सज्ज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande