रत्नागिरी जिल्ह्यातील ४१५ साकव नादुरुस्त
रत्नागिरी, 26 मार्च, (हिं. स.) : ग्रामीण भागातील दळणवळणाचा मुख्य कणा असलेले साकव (छोटे पूल) सध्या अत्यत दयनीय अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील एकूण ४१५ साकांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. या साकवांच्या दुरुस्तीकामांसाठी सुमारे ३०.९२ लाखाचा निधी अपेक्षित आह
रत्नागिरी जिल्ह्यातील ४१५ साकव नादुरुस्त


रत्नागिरी, 26 मार्च, (हिं. स.) : ग्रामीण भागातील दळणवळणाचा मुख्य कणा असलेले साकव (छोटे पूल) सध्या अत्यत दयनीय अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील एकूण ४१५ साकांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. या साकवांच्या दुरुस्तीकामांसाठी सुमारे ३०.९२ लाखाचा निधी अपेक्षित आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ही कामे वेळेत पूर्ण करणे प्रशासनासाठी आव्हानाचे आहे

साकव बांधण्यासाठी प्राप्त झालेला कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात रत्नागिरी आणि चिपळूण जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अपयश आले आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि नियोजनाच्या अभावामुळे रत्नागिरी तालुक्यातील ७० लाख आणि चिपळूण विभागातील १ कोटी ४४ लाख ७० हजार असा एकूण २ कोटी १५ लाख ७० हजार रुपयांचा निधी राज्य सरकारकडे परत गेत्ता आहे. या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील सुमारे ३०हून अधिक गावांमधील पुलांची कामे आता अधांतरी लटकली आहेत.

जिल्ह्यातील २९ साकव इतके मोडकळीस आले आहेत की, त्यांची दुरुस्ती करणे आता अशक्य आहे. त्यांची पूर्णपणे पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. यासाठी ८ कोटी ९२ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. यामध्ये तांजा तालुक्यात सर्वाधिक १७ साकवांच्या पुनर्बांधणीसाठी ५९२ लाख रुपये अपेक्षित आहेत. संगमेश्वर (८), राजापूर (३) आणि रत्नागिरी (१) या तालुक्यांचाही यात समावेश आहे.

केवळ पुनर्बांधणीच नाही, तर जिल्ह्यातीत ३८६ साकवांना तातडीने दुरुस्तीची गरज आहे. यासाठी २२ कोटी २० लाखाचा आराखडा तयार करण्यात आत्ता आहे. संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक ११५ साकवांच्या दुरुस्तीसाती १२.५९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापाठोपाठ राजापूर (१०२), रत्नागिरी (९४) आणि लांजा (७५) या तालुक्यांतीत साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्यात ग्रामीण भागातीत नद्यानाल्यांना येणारा पूर आणि साकवांची ही दुरवस्था पामुळे नागरिकांच्या जीविताला थोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या कामांना तातडीने गती द्यावी, अशी मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande