६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार पुरस्काराची घोषणा
मुंबई, 26 मार्च (हिं.स.) : ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार २६ मार्च २०२६ रोजी केली. नामांकने प्राप्त झालेले कला
६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार पुरस्काराची घोषणा


मुंबई, 26 मार्च (हिं.स.) : ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवार २६ मार्च २०२६ रोजी केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार , सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

सन २०२४ या वर्षातील ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी १) स्थळ २) छबिला ३) कुर्ला टू वेंगुर्ला ४) धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ५) घात , ६) स्वरगंधर्व सुधीर फडके ७) घरत गणपती , ८) नवरदेव BSC.AGRI. ९) नाच गं घुमा, १०) मुक्काम पोष्ट देवाचं घर

या दहा चित्रपटांना अंतिम फेरीचे नामांकन प्राप्त झाले आहे. तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून सावित्रीच्या लेकी चित्रपटातील १) धनश्री भोसले २) दृष्टी मोरे ३) रसिका खंडागळे ४) एजल कालीकुरी याना पुरस्कार जाहीर झाला आहे.

अंतिम घोषित पारितोषिके

तांत्रिक विभाग

१. उत्कृष्ट कला दिग्दर्शन -

संगीत मानापमान - संतोष फुटाणे.

स्वरगंधर्व सुधीर फडके - महेश कोरे

२. उत्कृष्ट छायालेखन-

१) स्वरगंधर्व सुधीर फडके - महेश आणे

२) फुलवंती - महेश लिमये

३. उत्कृष्ट संकलन •-

१) स्थळ - अभिजित देशपांडे

२) कुर्ला टू वेंगुर्ला - विजय कलमकर

४. उत्कृष्ट ध्वनीमुद्रण -

१) छबीला - सतीश दडस

५. उत्कृष्ट ध्वनीसंयोजन -

१) स्थळ - संजय चतुर्वेदी

६. उत्कृष्ट वेशभूषा-

१)धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज १) गणेश लोणारे

२) सजना - शिवाजी करडे

७. उत्कृष्ट रंगभूषा -

१) मंगला - संजय सिंग

२) धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज - संतोष गिलबिले

यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नामनिर्देशन विभाग

१. सर्वोत्कृष्ट कथा-

१) जयंत सोमलकर - स्थळ

२) जितेंद्र बर्डे - मोऱ्या

३) छत्रपाल निनावे - घात

२. उत्कृष्ट पटकथा -

१) जयंत सोमलकर - स्थळ

२) छत्रपाल निनावे - घात

३) अमरजीत आमले - कुर्ला टू वेंगुर्ला

३. उत्कृष्ट संवाद-

१) जयंत सोमलकर - स्थळ

२) अ. राम खाटमोडे - नवरदेव BSC. AGRI

ब. विनोद वणवे - नवरदेव BSC. AGRI

३) गणेश मंगेश पंडित - ओले आले

४. उत्कृष्ट गीत -

१) गुरु ठाकूर - येक नंबर - जाहीर झालं जगाला

२) रॉकसन - नवरदेव BSC.AGRI - लाल चिखल

३) अमरजीत आमले - कुर्ला टू वेंगुर्ला - इवल्याशा जागी

५. उत्कृष्ट संगीत-

१) अक्षय खोत - कुर्ला टू वेंगुर्ला

२) अमित राज - फसक्लास दाभाडे

३) मोहित कुलकर्णी - धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज

६. उत्कृष्ट पार्श्वसंगीत-

१) संतोष मुळेकर - संगीत मानापमान

२) समीर म्हात्रे - लाईफ लाईन

३) आदित्य बेडेकर -मुक्काम पोस्ट देवाचं घर

७. उत्कृष्ट पार्श्वगायक-

१) अजय गोगावले - येक नंबर , जाहीर झालं

२) आदर्श शिंदे - लग्न कल्लोळ - घाव लागला

३) हर्षवर्धन वावरे - रुखवत - लुक लुक चांदणी

८. उत्कृष्ट पार्श्वगायिका-

१) आनंदी जोशी - डिअर लव्ह - फितूर मन

२) राजेश्वरी पवार - सजना - झोका

३) आर्या आंबेकर - कासरा - मन पळतया

९. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक -

१) उमेश जाधव - फुलवंती

२) राहुल ठोंबरे - लाईक आणि सबस्क्राईब

३) सुजित कुमार - फसक्लास दाभाडे

१०. उत्कृष्ट अभिनेता-

१) सुनिल बर्वे - स्वरगंधर्व सुधीर फडके

२) मिलिंद शिंदे - घात

३) गश्मीर महाजनी - फुलवंती

११. उत्कृष्ट अभिनेत्री-

१) स्वाती गोतावळे - छबिला

२) नंदिनी चिकटे - स्थळ

३) सुरुची अडारकर - घात

१२. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री-

१) श्वेता पारखे - राजकारण गेलं मिशीत

२) रितिका श्रोत्री - मुक्काम पोस्ट बोंबील वाडी

३) तृप्ती शेडगे - फसक्लास दाभाडे

१३. उत्कृष्ट विनोदी अभिनेता

- १) नितीन कुलकर्णी - विषय हार्ड

२) अमेय परब - कुर्ला टू वेंगुर्ला

३) प्रकाश भागवत - राजकारण गेलं मिशीत

१४. सहाय्यक अभिनेता-

१) तारानाथ खिरतकर - स्थळ

२) जनार्दन कदम - घात

३) धनंजय मांडवकर - घात

१५. सहाय्यक अभिनेत्री -

१) सुषमा देशपांडे - घरत गणपती

२) नम्रता संभेराव - नाच गं घुमा

३) क्षिती जोग - फसक्लास दाभाडे

१६. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता - १) सुमित पाटील - विषय हार्ड

२) जितेंद्र बर्डे - मोऱ्या

३) आदिश वैद्य - स्वरगंधर्व सुधीर फडके

१७. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-

१) भक्ती घोगरे - गिराण

२) काजल परदेशी - छबिला

३) अनघा राणे - कुर्ला टू वेंगुर्ला

• अंतिम फेरी करिता प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती:-

१) सावित्रीच्या लेकी - पुष्पराज बिऱ्हाडे फिल्म्स

२) सजना - शशिकांत धोत्रे आर्ट्स

३) भुंडीस - अ स्क्वेअर ग्रुप

•प्रथम पदार्पण दिग्दर्शन

१) विषय हार्ड - सुमित स. पाटील

२) फॉलोअर - हर्षद नलावडे

३) छबिला - अनिल अमृत भालेराव

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ७० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

प्राथमिक फेरीचे परीक्षण १) मिताली जगताप २) मिलिंद गवळी ३) उल्हास नांद्रे ४) उदयसिंह मोहिते ५) विजय खोचीकर, ६) सुहास राणे ७) पुनम चाळके- पवार ८) नंदू वर्दम ९) मीरा वेलणकर, १०) सुबोध पवार ११) लहू पांचाळ, १२) किशु पॉल १३) नरेंद्र बंडवे, १४) मनोज कदम १५) दिपक कदम आदी परीक्षकांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande