अंबाजोगाई नर्सिंग महाविद्यालयासाठी 'जायका' प्रकल्पातून मोठा निधी मंजूर
बीड, 26 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई येथील नर्सिंग महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी केंद्र शासन आणि ''जायका'' प्रकल्पांतर्गत मोठा निधी मंजूर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याची नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे. केज विधानसभा मतद
अंबाजोगाई नर्सिंग महाविद्यालयासाठी 'जायका' प्रकल्पातून मोठा निधी मंजूर


बीड, 26 मार्च (हिं.स.)।

अंबाजोगाई येथील नर्सिंग महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी केंद्र शासन आणि 'जायका' प्रकल्पांतर्गत मोठा निधी मंजूर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याची नुकतीच अधिकृत घोषणा केली आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या महाविद्यालयाच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आखलेल्या ३७०८ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा एक भाग असून जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या सहकार्याने हा विकास प्रकल्प राबवला जाणार आहे. या निधीमुळे महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक पातळीवर प्रशिक्षित परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी निर्माण झाल्यामुळे परिसरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार मुंदडा यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून यामुळे अंबाजोगाईच्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande