अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्य ठार
जळगाव, 26 मार्च (हिं.स.) जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केल्याचे दिसून
अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्य ठार


जळगाव, 26 मार्च (हिं.स.) जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केल्याचे दिसून आले. मुझफ्फर अली सय्यद बबन (६०) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (५५) दोन्ही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मयत झालेल्या दांपत्याचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये मुझफ्फर अली सैय्यद बबन हे आपले पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मसाला विक्री करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचे चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्याकारणामुळे ते आपल्या पत्नी ताहेराबी यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ इजे ३८९८) जळगाव येथून फर्दापूर येथे गेले होते. लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह दोघेजण खाली पडले. या भीषण अपघातात मुझफ्फर अली सय्यद बबन आणि ताहेराबी मुजफ्फर अली हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता दोघांना मयत घोषित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande