
सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)।
तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसामध्ये तालुक्यात आंबा, द्राक्ष, मका, दोडका, या भाजीपाला सदृश्य पिकाचे नुकसान झाले असून प्रशासनाने चक्क तालुक्यात नुकसान नसल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिल्यामुळे बाधित शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.या तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात नुकसानीच्या झळा वारंवार शेतकऱ्याला सोसाव्या लागत आहेत मात्र शेतकरी सुद्धा एखाद्या पहाडासारखे या संकटाला सामोरे जात आहे. परंतु बाधित पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रशासन दक्ष राहणे अपेक्षित आहे. पण तितक्या प्रमाणात राहत नाही. अगदी तीच परिस्थिती पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची आहे. पिकविमा भरून देखील अद्याप शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. नुकतेच तालुक्यात सायंकाळी दरम्यान वादळे पावसाचा तडाका दिला. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या झाडावर असलेल्या द्राक्षांचे नुकसान झाले, याशिवाय काही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे फळगळती देखील झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड