श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने धुळ्यात भव्य बाईक रॅली
धुळे , 26 मार्च (हिं.स.) श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी धुळे शहरातून भव्य अशी बाईक रॅली काढत जय श्रीराम घोषणांनी धुळे शहर दणाणून सोडले. मोठ्या उत्साहात निघालेल्या या बाईक रॅलीत श्रीराम, सिता माता, लक्ष्मण, हनुमानाच्या तसेच वानरसेनेच्य
श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने धुळ्यात भव्य बाईक रॅली


धुळे , 26 मार्च (हिं.स.) श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी धुळे शहरातून भव्य अशी बाईक रॅली काढत जय श्रीराम घोषणांनी धुळे शहर दणाणून सोडले. मोठ्या उत्साहात निघालेल्या या बाईक रॅलीत श्रीराम, सिता माता, लक्ष्मण, हनुमानाच्या तसेच वानरसेनेच्या रुपातील बालकांनी सवारचे लक्ष वेधून घेतले. गेल्या ११ वषारपासून धुळे शहरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. या श्रीराम नवमी उत्सव समितीत धुळे शहरातील प्रत्येक प्रभागातील व चौका चौकातील युवक सहभागी होत असतात कोणताही राजकीय स्वार्थ न बाळगता केवळ धर्मकार्यासाठी एकत्रित दिसणारे हे धुळे शहरातील एक मात्र संघटन आहे यात सर्व संघटना पक्ष जात भेद विसरून केवळ हिंदू म्हणून सर्व एकत्र येत असतात. याच उत्साहात आज सकाळी धुळे शहरातील संतोषी माता मंदिराजवळून सकाळी बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. जय काढून आग्रारोडवरील श्रीराम मंदिर येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी श्रीराम नवमी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश भोकरे, उद्योजक चेतन मंडोरे, किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती जोगी, शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्हे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande