चंद्रपूर : चैत्र नवरात्र यात्रेनिमित्त महाकाली मंदिर परिसरात ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण
चंद्रपूर, 26 मार्च (हिं.स.)। आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र नवरात्र यात्रे निमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने गुरुवारी श्री महाकाली मंदिर परिसरात ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजार
चंद्रपूर : चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण


चंद्रपूर, 26 मार्च (हिं.स.)।

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र नवरात्र यात्रे निमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने गुरुवारी श्री महाकाली मंदिर परिसरात ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधिवत पूजन करून भक्तांच्या दर्शनासाठी मूर्तीची मंदिर परिसरात स्थापना करण्यात आली.

या कार्यक्रमाला श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सुनील महाकाले, विश्वस्त श्याम धोपटे, पवन सराफ, प्रसाद जोरगेवार, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, बलराम डोडाणी, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजचा हा दिवस अत्यंत पवित्र, ऊर्जादायी आहे. आपल्या चंद्रपूर शहराची आराध्य देवी असलेल्या श्री महाकाली मातेच्या साक्षीने आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत. हा क्षण केवळ धार्मिक नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि एकतेची जाणीव करून देणारा आहे. आज आपण ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण केले आहे. हा ध्वज आपल्या श्रद्धेचा, आत्मविश्वासाचा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. तो आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो आणि सर्वांना एकत्र बांधण्याचे कार्य करतो, असेही त्यांनी सांगितले.

आज आपण माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधिवत पूजन केले आणि भक्तांच्या दर्शनासाठी मूर्तीची मंदिर परिसरात स्थापना केली. हा केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे. माता महाकालीच्या मूर्तीची स्थापना आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना आहे. अशा पवित्र सोहळ्यांमुळे आपल्या समाजात भक्तीभाव वाढतो आणि एकतेची भावना अधिक दृढ होते असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, चैत्र नवरात्र यात्रेनिमित्त राज्यभरातून चंद्रपूरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली असून, प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवला जात असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande