चंद्रपूर येथे भव्य आणि आकर्षक रामनवमी शोभायात्रा
चंद्रपूर, 26 मार्च (हिं.स.)।राम नवमीच्या पवित्र आणि उत्साहपूर्ण पर्वानिमित्त चंद्रपूर शहरातून भव्य आणि आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. धार्मिक घोषणांनी, ढोल-ताशांच्या गजरात तसेच विविध मंडळांच्या देखण्या झांकींनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन
शहरातून भव्य आणि आकर्षक रामनवमी शोभायात्रा


चंद्रपूर, 26 मार्च (हिं.स.)।राम नवमीच्या पवित्र आणि उत्साहपूर्ण पर्वानिमित्त चंद्रपूर शहरातून भव्य आणि आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. धार्मिक घोषणांनी, ढोल-ताशांच्या गजरात तसेच विविध मंडळांच्या देखण्या झांकींनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

सदर शोभायात्रा गांधी चौकात पोहोचताच भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आ.सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले होते.सायंकाळी ७ वाजता सदर शोभायात्रेला सुरवात झाली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा गांधी चौक येथे पोहोचली. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने भव्य स्वागत मंच उभारण्यात आला होता. विविध मंडळांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या झांकी, रथ आणि पारंपरिक सादरीकरणांचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, शहरातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध ठिकाणी शीतपेय, पाणी आणि भोजनदानाचे पंडाल उभारण्यात आले होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande