परभणी - डॉ. प्रतीक रोकडे यांना एमबीबीएस पदवी प्रदान
परभणी, 26 मार्च, (हिं.स.)। शासकीय आयटीआय, मानवत येथील भांडारपाल दिपक रोकडे यांचे चिरंजीव डॉ. प्रतीक दीपक रोकडे यांनी चिपळून येथील बीकेएल वालवडकर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच पार
डॉ. प्रतीक रोकडे यांना एमबीबीएस पदवी प्रदान


परभणी, 26 मार्च, (हिं.स.)। शासकीय आयटीआय, मानवत येथील भांडारपाल दिपक रोकडे यांचे चिरंजीव डॉ. प्रतीक दीपक रोकडे यांनी चिपळून येथील बीकेएल वालवडकर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते तसेच वडील दिपक रोकडे व आई सौ. प्रतिमा रोकडे यांच्या उपस्थितीत त्यांनी पदवी ग्रहण केली.

विशेष म्हणजे दिपक रोकडे यांना दोन मुले असून दोघांनीही एमबीबीएस पदवी प्राप्त करत आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. या यशाबद्दल भाऊ डॉ. ऋत्विक दीपक रोकडे, मामा डॉ. गणेश मसारे तसेच मानवत आयटीआयचे गट निदेशक कल्याण पटेकर, निदेशक संजय पवार आणि सर्व कर्मचारीवृंद यांनी रोकडे परिवाराचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande