लातूर - शिवली येथे हनुमान यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी
लातूर, 26 मार्च (हिं.स.)।औसा तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले शिवली येथील ग्रामदैवत हनुमान देवस्थानाचा भव्य ''शिवली हनुमान यात्रा महोत्सव'' दि. ४ ते ७ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा पावन स
हनुमान जयंती


लातूर, 26 मार्च (हिं.स.)।औसा तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले शिवली येथील ग्रामदैवत हनुमान देवस्थानाचा भव्य 'शिवली हनुमान यात्रा महोत्सव' दि. ४ ते ७ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा पावन सोहळा ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळाने केले आहे. यात्रेदरम्यान दररोज पहाटे ५ ते दुपारी १२ या वेळेत दंडवत, अभिषेक व लोटांगणाचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत पारंपरिक भारूड कार्यक्रम होणार असून सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत शुगर व रक्त तपासणी शिबीर आयोजित केले आहे. दुपारी १२ ते संध्याकाळी ९ पर्यंत भक्तांचे लोटांगण व महाप्रसाद वाटप सुरू राहणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत भारूड सम्राट ह.भ.प. सावता केशव फुले यांचा रंगीत सोंगी भारूड कार्यक्रम सादर होईल त्यानंतर मल्लांचा भव्य कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. रात्री ८ नंतर भजन संध्या व 'मायबोली महाराष्ट्राची सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. तसेच संध्याकाळी ६ ते मंगळवारी सकाळी ६ पर्यंत भक्तिमय 'लक्ष्मणशक्ती सोहळा' पार पडणान आहे. यात्रेची सांगता मंगळवारी सकाळी ६ वाजता महाआरतीने होऊन दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदीर देवस्थान समितीच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात. या महोत्सवामुळे शिवली गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांसाठी हा आध्यात्मिक मेळावा ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande