रत्नागिरी : राजवाडीत शुक्रवारी शेतकरी सहाय्यता मेळावा
रत्नागिरी, 26 मार्च, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे शुक्रवारी (दि. २७ मार्च) शेतकरी सहाय्यता कार्यक्रमाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे अडीच टन तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. राजवाडीच्या परिसरात कार्यरत असलेल्या पीपल्स एम्प
रत्नागिरी : राजवाडीत शुक्रवारी शेतकरी सहाय्यता मेळावा


रत्नागिरी, 26 मार्च, (हिं. स.) : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे शुक्रवारी (दि. २७ मार्च) शेतकरी सहाय्यता कार्यक्रमाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे अडीच टन तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे.

राजवाडीच्या परिसरात कार्यरत असलेल्या पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट या संस्थेच्या पुढाकाराने राजवाडी, चिखली आणि धामणी या तीन गावांमध्ये काही वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या गटांमधील अनेक सदस्यांचे मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. अशा एकूण ४४ शेतकऱ्यांना या कार्यक्रमामध्ये पुण्याचे बॉंसुरी फौंडेशन-ॲलिकॉन कॅस्टलॉय आणि पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने

प्रत्येकी ६० किलो तांदूळ देण्यात येणार आहे. राजवाडी येथील राधाकृष्ण मंदिरात दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संगमेश्वर तालुक्याचे कृषी अधिकारी विनोद हेगडे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि विविध कृषी योजनांची माहिती ते देणार आहेत. या संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande