दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता वित्तीय सहाय्य : स्वावलंबनाची सुवर्णसंधी; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
परभणी, 26 मार्च (हिं.स.)। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता साधनसामग्री (टुलकिट) घेण्यासाठी वित्तीय सहाय्य ही योजना राज्यशासनाने सुरु केली आहे. त्याचा लाभ दिव्यांग नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आर.व्ही.
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता वित्तीय सहाय्य : स्वावलंबनाची सुवर्णसंधी; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


परभणी, 26 मार्च (हिं.स.)।

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता साधनसामग्री (टुलकिट) घेण्यासाठी वित्तीय सहाय्य ही योजना राज्यशासनाने सुरु केली आहे. त्याचा लाभ दिव्यांग नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आर.व्ही. चकोर यांनी केले आहे. योजेनच्या लाभाचे निकष - ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील. अर्जदार / लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. योजनेतंर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा रुपये 15,000/- इतकी राहील. शासकीय प्रशिक्षण संस्थेस/शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी या योजनेसाठी पात्र असेल. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसामग्री (टुलकि) साठीच असेल. लाभार्थ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे - विहीत नमुन्यातील अर्ज, आधारसंलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) दिव्यांगत्व प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधनसामग्री (टुलकिट) / आवश्यक साहित्याची यादी. आधारसंलग्न बँक खात्याचा तपशील. सदर योजनेचे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरील अर्जाची छाननी करत असताना अर्जदाराचे अधिवास प्रमाणपत्र ऐवजी वीज बील, रेशन कार्ड अपलोड केलेले असतात. तरी अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे याशिवाय इतर कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाही.त्याचप्रमाणे केवळ दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले जाते परंतु युडीआयडी कार्ड संलग्न केले जात नाही. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्राऐवजी केवळ एमएस-सीआयटी किंवा अनुभव प्रमाणपत्र सादर केलेले असतात. परंतु टुलकिट योजना प्रशिक्षण प्राप्त उमेद्वारांसाठीच आहे. तरी शासनमान्य/शासकीय/दिव्यांग कर्म शाळेमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे तेच जोडले जावे. त्याचप्रमाणे टुलकिट यादी ऐवजी व्यवसायाचे फोटो सादर केलेले असतात. प्राप्त प्रशिक्षणानुसार आवश्यक टुलकिटची यादी संबंधित प्रशिक्षण संस्थेकडून प्रमाणित करून घेतलेली जोडावी.उपरोक्त प्रमाणे सादर केलेले अर्ज हे नामंजूर करून परत केले जातात. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. तरी आवश्यक वाबींची पूर्तता असलेले अर्ज दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सादर करावेत. अर्ज सादर करताना दिव्यांग कल्याण विभागाचा शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2026 मधील मुदा क्र. 2 व 3 च्या निकषानुसार अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेतील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चकोर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande