लातूर - श्री राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा
लातूर, 26 मार्च, (हिं.स.)। प्रभू श्रीराम हे सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण समाजात एकोपा, शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचे काम आपण सर्वांनी करावे. प्रभु श्री रामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आजच्या तर
श्रीराम जन्मोत्सव


लातूर, 26 मार्च, (हिं.स.)। प्रभू श्रीराम हे सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण समाजात एकोपा, शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचे काम आपण सर्वांनी करावे. प्रभु श्री रामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आजच्या तरूणांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर शहरात आयोजीत श्री राम नवमीनिमित्त भव्य शोभा यात्रेप्रसंगी बोलत होते.

श्री राम नवमीच्या पावन निमित्ताने उदगीर शहरात पारंपरिक उत्साहात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. विविध धार्मिक, सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताक्यांनी व फुलांनी सजलेल्या रथांमधून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे दर्शन नागरीकांनी घेतले.

यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पावन प्रसंगी आमदार संजय बनसोडे यांनी सर्व नागरिकांना श्री राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्षा स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, जि.प. सदस्य दिलीपकुमार मटके, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, नगरसेविका निकिता अंबरखाने, रेखा उप्परबावडे, विजय निटुरे, आशिष अंबरखाने, धिरज कसबे, धनाजी मुळे, मनोज पुदाले, प्रशांत मांगुळकर, सतिश पाटील, अमोल अनकल्ले, कैलास पाटील , वसंत पाटील, संतोष गिरी महाराज, यमुनाजी भुजबळे, कमलाकर फुले, कुणाल बागबंदे, नरसिंग शिंदे, प्रकाश बिरादार, अमोल निडवदे, आदी उपस्थित होते.

यावेळी आ.संजय बनसोडे यांनी शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

शोभायात्रे दरम्यान पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा शांततेत व उत्साहात पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande