अमरावती महानगरपालिकेत IWMS प्रणाली प्रशिक्षण संपन्न
अमरावती, 26 मार्च, (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्य वतीने प्रणालीसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे ही कार्यशाळा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्य
अमरावती महानगरपालिकेत IWMS प्रणाली प्रशिक्षण


अमरावती, 26 मार्च, (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्य वतीने प्रणालीसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे ही कार्यशाळा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाला उपायुक्त नरेंद्र वानखडे तसेच विविध विभागांचे अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी IWMS प्रणालीचे उद्दिष्ट, फायदे आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता वाढवणे आणि कार्यक्षमता सुधारणा करणे हा या प्रणालीचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रणालीमुळे प्रकल्प व्यवस्थापन, देखभाल, संसाधनांचे नियोजन, विविध कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे तसेच तांत्रिक अहवाल तयार करणे अधिक सुलभ होणार आहे. “IWMS प्रणालीचा प्रभावी वापर केल्यास नागरिकांना अधिक जलद, कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा देणे शक्य होईल,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेदरम्यान अभियंत्यांना प्रणालीचे तांत्रिक तपशील, डेटा एन्ट्रीची प्रक्रिया, विविध मॉड्युल्सची कार्यपद्धती आणि अहवाल तयार करण्याच्या नव्या पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय प्रत्यक्ष अॅप्लिकेशनवर प्रात्यक्षिक दाखवून प्रणालीचा वापर कसा करायचा हेही समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांनी प्रणालीबाबत प्रश्न विचारले, अडचणी मांडल्या आणि त्यावर प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनीही चर्चेत सक्रिय सहभाग घेत सूचना नोंदवल्या.

या प्रशिक्षणामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून विभागांमधील समन्वय सुधारेल आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देणे शक्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande