जळगाव - केळीला अत्यल्प दर; आ. जावळे यांची कारवाईची मागणी
जळगाव, 26 मार्च, (हिं.स.) - जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकयांना सध्या कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पत्रात नम
जळगाव - केळीला अत्यल्प दर; आ. जावळे यांची कारवाईची मागणी


जळगाव, 26 मार्च, (हिं.स.) - जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकयांना सध्या कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर हे परंपरेने बहऱ्हाणपूर मंडीतील दरांवर आधारित ठरवले जातात. सध्या बऱ्हाणपूर मंडीमध्ये केळीचा दर सुमारे रु. १६०० ते १७०० प्रति क्विंटल इतका असताना, जळगाव जिल्ह्यातील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ रु. ५०० ते ६०० प्रति क्विंटल या अत्यल्प दराने खरेदी करत आहेत.हा दर अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी पत्रात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande