कुकडी प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा
पुणे, 26 मार्च, (हिं.स.)। कुकडी प्रकल्पातून मागील महिनाभरापासून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा पातळी खालावली आहे. प्रकल्पात आज अखेर ११.०९ टीएमसी (४०.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आले
कुकडी प्रकल्पात ४० टक्के पाणीसाठा


पुणे, 26 मार्च, (हिं.स.)। कुकडी प्रकल्पातून मागील महिनाभरापासून उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने प्रकल्पातील धरणांतील पाणीसाठा पातळी खालावली आहे. प्रकल्पात आज अखेर ११.०९ टीएमसी (४०.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेले आवर्तन १० एप्रिल रोजी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांनी दिली.

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून २५० किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात ५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुरु केले होते. हे आवर्तन १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. सद्यःस्थितीत कुकडी डावा कालव्यात १४५० क्यूसेकने, डिंभे डावा कालव्यात ६७५ क्यूसेकने, उजव्या कालव्यात २२० क्यूसेकने, मीना शाखा कालव्यात २०० क्यूसेकने आवर्तन सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande