वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांना एक कोटींची मानहानीचा नोटीस
छत्रपती संभाजीनगर, 26 मार्च (हिं.स.) : एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीशी संबंधित नेत्यांनी एक कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. माहितीनुसार, इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दलित समाजाचा अप
वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांना एक कोटींची मानहानीचा नोटीस


छत्रपती संभाजीनगर, 26 मार्च (हिं.स.) : एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीशी संबंधित नेत्यांनी एक कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे.

माहितीनुसार, इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दलित समाजाचा अपमान केल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. त्याचबरोबर, काही संघटनांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वंचित आघाडीचे नेते अफजल खान यांनी जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की, त्यांनी कोट्यवधी रुपयांची अवैध मालमत्ता जमा केली आहे. संभाजीनगरमध्ये झालेल्या एका आंदोलनानंतर वंचित आणि आंबेडकरी संघटना जलील यांच्याविरोधात आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा मानहानीचा नोटीस पाठवण्यात आला आहे.

इम्तियाज जलील यांनी म्हटले, “2019 च्या लोकसभा निवडणुकीत मला खासदार करण्यात आमच्या दलित बांधवांचा मोठा वाटा होता.” त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी संभाजीनगर महानगरपालिकेच्या रमाई आवास योजनेत कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपात त्यांनी सत्ताधारी भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांच्या काही नगरसेवकांची नावे घेतली आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande