आ. रत्नाकर गुट्टे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
परभणी, 26 मार्च (हिं.स.)। गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत परभणी जिल्हा परिषद महायुतीचे वर्चस्व आल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत निवडणुकीतील काम
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट जि.प. निवडणुकीतील कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन


परभणी, 26 मार्च (हिं.स.)।

गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत परभणी जिल्हा परिषद महायुतीचे वर्चस्व आल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत निवडणुकीतील कामगिरीबद्दल आमदार गुट्टे यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार राजेश विटेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अँड. श्रीकांत विटेकर, मानवत नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, तसेच पंकज आंबेगावकर, अजिंक्य नखाते, प्रणित खंजे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी जिल्ह्यातील नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थितांचे कौतुक केले. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी उत्साहाने आणि समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व आमदार राजेश विटेकर यांनी परभणी जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लताताई वाकळे व इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्यांवर चर्चा केली होती. परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande