
छत्रपती संभाजीनगर, 26 मार्च (हिं.स.)।राज्य परीक्षा परिषदेने 'शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६'चे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होणार आहे. तर २१ जून रोजी 'महाटीईटी-२०२६' घेतली जाणार आहे.
परीक्षा परिषदेने परीक्षेच्या कार्यवाहीचे वेळापत्रक जाहीर केले. सर्व शाळांमधील शिक्षण सेवक, शिक्षक पदासाठीच्या नियुक्तीसाठी 'टीईटी' उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर-१) व इयत्ता सहावी ते आठवीसाठी (पेपर-२) असे दोन स्तर आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया परिषदेच्या https://mahatet.in या
वेबसाइटवरुन होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे यासह परीक्षेचा कालावधी इतर सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी वेबसाईटलाही नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू होत असून १६ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीही २७ मार्च ते १६ एप्रिल असा आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis