ईशान्येश्वर मंदिराला चांगल्या भावनेने पैसे दिले - मंत्री गिरीष महाजन
नाशिक, 26 मार्च (हिं.स.)। भोंदू अशोक खरात निर्मित सिन्नर स्थित ईशान्येश्वर मंदिराला शासनाने चांगल्या भावनेने १ कोटी ०५ लाख रूपये दिले. मात्र खरातचे कारनामे बघता त्याचे अपराध अक्षम्य आहेत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री जातीने या प
Money given to Ishanyeshwar


नाशिक, 26 मार्च (हिं.स.)।

भोंदू अशोक खरात निर्मित सिन्नर स्थित ईशान्येश्वर मंदिराला शासनाने चांगल्या भावनेने १ कोटी ०५ लाख रूपये दिले. मात्र खरातचे कारनामे बघता त्याचे अपराध अक्षम्य आहेत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री जातीने या प्रकरणावर अतिशय गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत अशी माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

नाशिकमधील पेट्रोल डिझेलच्या पुर्ततेबाबत आढावा घेण्यासाठी गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (दि.२६) पेट्रोल असोसिएशनसोबत बैठक घेतली यानंतर भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी गिरीश महाजन यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केले. यावेळी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आहेर-आडके, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री महाजन म्हणाले की, राज्यातील मंदिराचे अ, ब आणि क दर्जात विभाजन करण्यात आले असून मंदिरांच्या विकासासाठी शासकीय निधीत वाढ करण्यात आली आहे. मागणीनूसार सिन्नरस्थित ईशान्येश्वर मंदिराला शासकीय निधी देण्यात आला. सामान्यतः आपण सर्वजण श्रध्दाळू असतो. ज्याठिकाणी देवालय असेल तेथे आपण नतमस्तक होत असतो. तेथे आपण आपली सेवा देत असतो. शासनानेही देवालयाला मदत केली मात्र ही मदत करत असतांना शासनाला खरातच्या कारनाम्यांबाबत काहीही माहिती नव्हती. खरातचे अपराध अक्षम्य आहेत, खरातचे सोशल मिडीयावर व्हायरल झालेले व्हिडीओ बघता त्याच्याएवढा नालायकपणा कुणीही केलेला दिसत नाही. मु्ख्यमंत्री जातीने स्वतः खरातच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि अतिशय गंभीर आहेत. दोन महिन्यांपुर्वीच याविषयाची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करीत होते. महिलांचे लैंगिक शोषण, लोकांच्या श्रध्देचा घेतलेला गैरफायदा, आर्थिक लुट, फसवणूक यामुळे खरातला आपले उर्वरीत जीवन कारागृहातच घालवावे लागेल. खरातच्या हजारो कोटींच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात येतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande