सोलापूर - नवीन एमआरआय मशीन होणार उपलब्ध
सोलापूर, 26 मार्च, (हिं.स.)। श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयासाठी नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मशीन मिळण्यासाठीच्या आ. देवेंद्र कोठे यांच्या मागणीपत्रावर सही करत याबाबतचे निर्देश
Kote Devendra


सोलापूर, 26 मार्च, (हिं.स.)। श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयासाठी नवीन एम. आर. आय. मशीन उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मशीन मिळण्यासाठीच्या आ. देवेंद्र कोठे यांच्या मागणीपत्रावर सही करत याबाबतचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार निविदादेखील काढण्यात आली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सध्या असलेली एम.आर.आय. मशीन 12 वर्षे जुनी असून ती कालबाह्य झालेली आहे. या मशीनच्या विक्रीबाबतची निविदाही डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने काढली आहे.

सोलापूर शहर, जिल्ह्यासह परिसरातील जिल्हे तसेच कर्नाटक, तेलंगणातूनही रुग्ण सोलापुरात उपचारासाठी येतात. सोलापुरात उपचारासाठी आल्यानंतर खासगी रुग्णालयातून या रुग्णांना एम. आर. आय. करण्यासाठी खासगी ठिकाणी जावे लागत आहे. बहुतांश रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने आर्थिक अडचणींना सामोरे जात अधिक रक्कम देऊन एम. आर. आय. स्कॅन करून घ्यावे लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande