लातूर - श्री राम जन्मोत्सव निमित्ताने निलंगा शहरात शोभायात्रा
लातूर, 26 मार्च (हिं.स.)। मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जन्मोत्सव निमित्ताने रोजी निलंगा शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेची सुरुवात निलंगा नगरीचे नगराध्यक्ष संजय राज हलगरकर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आरतीने करण्यात आली.
श्रीराम जन्मोत्सव

राजमाता जिजाऊ चौकातून सुरू झालेल्या शोभायात्राची सांगता श्रीराम मंदिर येथे झाली.

यावेळी उपस्थित निलंगा नगरीचे नगराध्यक्ष श्री संजय राज हलगरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री शेषराव ममाळे सर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रवी फुलारी नगरसेवक रमेश कांबळे सभापती सौ.सोनाली हाडोळे सौ.सुधाताई वाघमारे सौ.मीनाक्षी देशपांडे सोशल मीडिया तालुकाध्यक्ष श्री सुमित इनानी आणि माजी नगरसेवक श्री शरद पेटकर श्री प्रकाश पटणे श्री माधव पटणे श्री अविराज पाटील श्री गजानन सूर्यवंशी श्री शंकर वेदपाठक श्री तुषार अंतरेड्डी श्री नटराज उडपी श्री माऊली भोसले इतर रामभक्त मुलं मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande