शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा
नांदेड, 26 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,
शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा


नांदेड, 26 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 27 मार्च रोजी हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 27 मार्च सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व सोनल मात्रे 8830807312 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande