पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव
पुणे, 26 मार्च, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने नियुक्तीचे आदेश देताना मूळ संस्थेचे ‘ना - हरकत प्रमाणपत्र’ आणि संस्थेने कार्यमुक्त केल्याचे प
University Pune SPUU


पुणे, 26 मार्च, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मनोहर सानप यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने नियुक्तीचे आदेश देताना मूळ संस्थेचे ‘ना - हरकत प्रमाणपत्र’ आणि संस्थेने कार्यमुक्त केल्याचे पत्र सादर करण्याची अट टाकली आहे. त्यामुळे डॉ. सानप हे पदभार नेमके कधी स्वीकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. डॉ. सानप यांच्या नियुक्तीचा आदेश विद्यापीठ प्रशासनाने काढला असल्याची बाब अधिकृत असल्याचे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवरून सांगितले आहे.

डॉ. सानप यांच्या नियुक्तीचा आदेश अधिकृतरीत्या काढला असतानाही, याबाबत अधिकृतरीत्या माहिती देण्याबाबत विद्यापीठ प्रशासन मौन बाळगून आहे.गेल्या अडीच वर्षांपासून विद्यापीठाच्या कुलसचिव पदाची नियुक्त रखडली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविला. याची दखल घेत अखेर विद्यापीठाने कुलसचिवांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठाने डॉ. सानप यांच्या नियुक्तीच्या आदेशात काही अटींची पुर्तता करण्यास सांगितले आहे. त्यानंतरच ही नियुक्ती ग्राह्य धरण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande