
लातूर, 26 मार्च (हिं.स.)लातूर शहर अन् परिसरातील नागरिकांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाणी. सातत्याने पाणीटंचाईला सामारे जावे लागणाऱ्या लातूरकरांवर यंदा मात्र पाणीटंचाईचे संकट भेडसावणार नाही. कारण लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरण प्रकल्पात ६७.७८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची असलेली उपलब्धा पाहता गतवर्षी उन्हाळ्यामध्ये ८ ते १० दिवसांनी झालेला पाणीपुरवठा यंदा असणार नसून सद्याच्या नियोजनानुसार लातूरकरांना चार दिवसाआड (पाचव्यादिवशी)पाणी मिळणार नाही. त्यामुळे तुर्तास तरी सर्वसामान्य लातूकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
मांजरा धरणावर अवलंबून असलेल्या धारशिव, बीड, लातूर जिल्ह्यातील
तब्बल २२ पाणीपुरवठा योजना आहेत. यामध्ये लातूर महानगरपालिका क्षेत्राचाह समावेश आहे. लातूर शहराला मांजरा धरणाातून पाणीपुरवठा केला जातो. लातूर शहरातील ५ लाख नागरिकांना दरडोई १३५ लिटर पाणी दिले जाते. यामध्ये शहरातील विविध जलकुंभामधून दर चार दिवसाआड पाणी मिळते. परंतु, उन्हाळा आल्यानंतर उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या भीतीने सर्वसामान्य लातूरकरांचा ाङ्गउमघाम होतो. कारण, मागील १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ साली मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे धरण कोरडेठक पडल्यामुळे लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. परंतु, मागील काही वर्षांपासून पर्जन्यमान समाधानकारक झाल्यामुळे पाण्याची दूर्लक्ष प्रखरतेने जाणवले नाही.
दरम्यान, गतवर्षी २३ मार्च रोजी मांजरा धरणातील जीवंत पाणीसाठा ४९.८७% एवढा होता. त्यामुळे मागील उन्हाळ्यात लातूकरांना ८ ते १० दिवसाआड पाणी मिळत होते. परंतु, या पावसाळ्यातील चांगला पावसाबरोबच परतीच्या पावसाने जोर धरल्यामुळे मांजरा धरण हे १०० टक्के भरले होते. अनेक दिवस धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. दरम्यान, सद्यस्थितीत मांजरा धरण प्रकल्पात ६७.७८ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध असून लातूरकरांना नियमितपणे दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. धरणातील उपलब्ध पाणी आणि लातूरसाठी आरक्षीत
पाणी पाहता मार्च सह एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या प्रखर महिन्यातही चार दिवसाआडच पाणी मिळणार असून ही लातूरकरांसाठी दिलासादायक बाब आहे. मांजरा धरणातील ६० दशलक्ष घनमिटर पाणी हे लातूरसाठी आरक्षीत आहे. यामध्ये महिन्याला ०.६ द.ल.घमी. पाण्याची तर दिवसाला लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दिवसाला महानगरपालिकेच्या वतीने १० टक्के पाण्याचा वेस्ट धरून ८९.१० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. शहरातील सरस्वती टाकी, गांधी चौक टाकी, अशोक हॉटेल परिसर टाकी, नांदेड नाका टाकी (२), डाल्टा टाकी, बसवेश्वर टाकी, एमजेपी टाकी, शासकीय टाकी, कॉईन नगर टाकी या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यात येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis