जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील 15 अधिकाऱ्यांवरती महसूल विभागाची कारवाई
मालेगावच्या ज्योती देवरे यांचाही समावेश, डॉ. गेडामानी केली होती या प्रकरणाची चौकशी नाशिक, 26 मार्च (हिं.स.)। - महसूल जमीन कायद्या अंतर्गत केलेल्या गैरप्रकारामुळे मालेगावच्या अप्पर तहसीलदार यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित करण्याचे आदेश
जमीन गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील 15 अधिकाऱ्यांवरती महसूल विभागाची कारवाई


मालेगावच्या ज्योती देवरे यांचाही समावेश,

डॉ. गेडामानी केली होती या प्रकरणाची चौकशी

नाशिक, 26 मार्च (हिं.स.)। - महसूल जमीन कायद्या अंतर्गत केलेल्या गैरप्रकारामुळे मालेगावच्या अप्पर तहसीलदार यांच्यासह 15 अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित करण्याचे आदेश बुधवारी उशिरा काढले आहेत यावरती नाशिकच्या विभागीय आयुक्त यांना पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे. महसूल विभागामध्ये एवढा मोठा प्रमाणावरती कारवाई झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे

याबाबत अधिक माहिती येते की, पुणे जिल्ह्यातील जमीन घोटाळ्यामध्ये या ठिकाणी काम करणाऱ्या तहसीलदार अप्पर तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी आणि इतर महसूल अधिकाऱ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणावर फेरफार करून भ्रष्टाचार केल्याचा संशय आला होता . या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने नाशिकच्या विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले होते या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर शासनाने ही तडकाफडकी कारवाई केलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावरून शासनाने काही महिन्यांपूर्वी पुणे येथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966/155 कायद्यानुसार राज्यातील 15 अधिकाऱ्यांवरती कारवाई करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत त्यांची ही सक्तीची रजा कायम राहणार आहे याबाबत उपलब्ध झालेल्या अधिक माहितीनुसार नाशिकच्या मालेगाव येथील अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांचा देखील यामध्ये समावेश असून त्यांच्यावरती पुढील सक्तीच्या रजेवरची पाठविण्याची कारवाई ही नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी करावयाची असल्याचे आदेशामध्ये सांगितलेले आहे. या बरोबरीने तहसीलदार गीता गायकवाड रवींद्र सबनीस, श्रीकांत पाटील , मधुसूदन बर्गे, ,संपत पाटील, मंडल अधिकारी व्यंकटेश भोसले मलाप्पा ढाणे, सुजाता रचेकर, सुरेश जगताप, मारुती चोरमल, महसूल सहाय्यक प्रल्हाद पाटील लिपिक श्रीकांत कुलकर्णी आदींचा समावेश आहे. त्या विभागाच्या विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश महसूल विभागाच्या कक्ष अधिकारी श्रद्धा मगर यांनी बुधवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे यामुळे महसूल विभागामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande