सोलापूर-एसआयआरसाठी सर्वच पक्षांच्या तयारीला वेग
सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)राज्यात १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एसआयआर (मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपकडून प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करत बूथनिहाय यंत्रणा सक्रिय
सोलापूर-एसआयआरसाठी सर्वच पक्षांच्या तयारीला वेग


सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)राज्यात १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एसआयआर (मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. भाजपकडून प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करत बूथनिहाय यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती व वरिष्ठांशी चर्चा सुरू केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हास्तरावर आढावा बैठक घेणार आहे. दरम्यान, एमआयएमने स्वतंत्र यंत्रणा उभी करून कार्यालय सुरू केले असून, वॉर्ड व गावनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदार पडताळणी मोहिमेस मदत केली जाईल, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

एसआयआरच्या बाबतीत प्रमुख व अभ्यासू कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. एसआयआरबाबत प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर लवकरच या संदर्भात बैठक घेऊन जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची माहिती सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली. सोलापूर शहरात येणाऱ्या तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांबाबत आम्ही दक्ष असल्याची माहितीही शहराध्यक्ष पवार यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande