कोदंडधारी राम मंदीरात रामदंडीची मानवंदना
Salute to Ramdandi at Kondanddhari Ram Temple
Salute to Ramdandi at


Salute to Ramdandi at


ढोलपथकाचा निनादः भजन किर्तनाने परिसर भक्तीमय,विद्यार्थी प्रदर्शन ठरले आकर्षण

नाशिक, 26 मार्च (हिं.स.)।

- सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला कॅम्पसमध्ये असलेल्या कोदंडधारी राम मंदीरात रामजन्मोत्सवानिमित्त गुरुवारी(ता.२६) भक्तीमय वातावरणात महापूजा करण्यात आली. कॉलेजच्या एनसीसी छात्र,रामदंडीसह रायफल व अश्वपथकाने मानवंदना दिली.भगव्या ध्वजासंह ढोलपथकाचा निनाद,रामरक्षा,भजन,किर्तनाने या परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामच्या नामघोषाने दिवसभर परिसर दुमदुमून गेला होता. संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह मिलिंद वैद्य, ज्योती वैद्य यांच्याहस्ते राममुर्तीचे सपत्निक अभिषेक पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, राममंदीराचे अध्यक्ष नरेंद्र वाणी, शालेय समितीच्या अध्यक्षा सुवर्णा दाबक,जयंत खेडेकर,जयंत खेडेकर, आसावरी धर्माधिकारी, सदस्य प्रमोद शिरोडे,शरद शिरोडे आदींसह संस्थेचे सदस्य व युनिटचे विभागप्रमुख उपस्थित होते.प्रभूरामचंद्रांना मानवंदना,रामदंडीचा अपुर्व उत्साह अन् जल्लोषसकाळी रामचंद्राच्या मुर्तीवर पडलेल्या किरणोत्सवाचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर जन्मोत्सवापुर्वी श्री.मिलिंद व ज्योती वैद्य यांच्याहस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वैद्य,देशपांडे, दाबक,धर्माधिकारी यांच्याहस्ते आरती करण्यात आली. यानिमित्ताने रूद्राणी संत यांचे रामजीवनावर आधारीत किर्तन झाले. त्यांनी विविध उदाहरणे देत रामचंद्राच्या जीवनाचे महत्व सर्वांना पटवून दिले. त्यांना देवेंद्र दाणी(तबला),चैतन्य गुरव(संवादिनी) यांनी साथसंगत केली.दुपारी बाराला प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्यावेळी लष्करी दिमाखात मानवंदना दिल्यानंतर शिक्षिकांनी पाळणा गात रामजन्म साजरा झाला. यावेळी उपस्थितांनी रामनामाचा एकच जयघोष केला.रामचंद्राच्या वेशभूषेतील युवकांने वेधले लक्ष प्रभू रामचंद्राच्या वेशभूषेतील युवकांला राम मंदीरात आणण्यात आले. जन्म झाल्यानंतर रामाच्या वेशभूषेतील त्या युवकांला घोष,अश्वपथकांच्या कॅडेटतर्फे मानवंदना देण्यात आली. रामाचा पाळणा झाल्यानंतर भगव्या वेशातील युवक-युवती,कार्यकर्त्यांकडून शंखनाद करण्यात आला. रामरक्षा पठणाबरोबरच आज दिवसभर विविध युनिटच्या शिक्षकांनी भजनसंध्येद्वारे रामचंद्रांच्याप्रती आपली सेवा सादर केली. यानिमित्ताने सायंकाळपर्यत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याने हा परिसर फुलून गेला होता. संस्थेच्यावतीने भाविकांना प्रसाद आणि मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले.चौकटविद्यार्थ्यांकडून रामचंद्राच्या जीवनावर प्रदर्शनसंस्थेच्या विविध युनिटमधील विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारीत विविध प्रसंग हे रांगोळीद्वारे साकारले आहे, मंदीर परिसरात मांडण्यात आलेल्या या प्रदर्शनाला भाविकांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी रांगोळीद्वारे साकारालेल्या प्रसंगाची उपस्थितांना माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांचे भाविकांनी कौतुक करत त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande